एकूण भेटी: — English मराठी
डेव्हलपमेंट सपोर्ट टीम
दुष्काळ आवाहन २०२६–२७ धाराशिव व सातारा या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये दुष्काळ निवारण व दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सहकार्याची विनंती

पुरानंतर कुटुंबांच्या सोबत

सालसे येथे पारधी समाजाच्या २१ कुटुंबांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप, ऑक्टोबर २०२५.

अधिक वाचा

समुदायांसाठी झटणाऱ्या संस्थांना आधार

नागरी समाज क्षेत्राच्या नव्याने निर्माण होणाऱ्या गरजा आणि अपेक्षा लक्षात घेऊन डेव्हलपमेंट सपोर्ट टीमची (डीएसटी) स्थापना झाली. ऐंशीच्या दशकात देशात बहुआयामी विकासकार्य करणाऱ्या अनेक संस्था उभ्या राहिल्या. या प्रामाणिक हेतूने काम करणाऱ्या संस्थांना कार्यक्रम आखणी, संस्थात्मक व्यवस्थापन, प्रशिक्षण, दस्तऐवजीकरण, संनियंत्रण आणि इतर तांत्रिक बाबींसाठी आधाराची गरज होती.

हा आधार देण्यासाठी समविचारी सामाजिक कार्यकर्ते, विकास क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते एकत्र आले आणि डीएसटीची स्थापना झाली. संस्थांना प्रभावीपणे व कार्यक्षमतेने काम करता यावे यासाठी गरजेनुसार, सातत्यपूर्ण आणि सहभागी पद्धतीने आधार देणे हे डीएसटीचे काम आहे.

आमच्याविषयी

आमचे सध्याचे कार्य

आज डीएसटीचे बहुतांश प्रत्यक्ष क्षेत्रकार्य दोन कार्यक्रमांतून चालते: पुण्यातील शहरी वस्त्यांमध्ये समुदाय मानसिक आरोग्य, आणि दुष्काळप्रवण महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांसोबत हवामान-अनुकूल उपजीविका.

कार्याची प्रमुख क्षेत्रे

  • हवामान बदल शमन आणि आरोग्यावरील परिणाम

    हवामान बदलाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यासह.

  • नैसर्गिक संसाधनांवर आधारित ग्रामीण उपजीविका

    हवामान-अनुकूल शेती, देशी बियाणे आणि पूरक उपजीविका.

  • लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरण

    बचत गट, महासंघ, आर्थिक साक्षरता आणि नेतृत्व.

  • आपत्ती व्यवस्थापन

    सहयोगी संस्थांसोबत पूर व दुष्काळ निवारण आणि दीर्घकालीन उपाययोजना.

कार्यशाळा आणि उपक्रम

YouTube वर पाहा

आपले योगदान सर्वाधिक गरज असलेल्या समुदायांपर्यंत पोहोचते

ग्रामीण व शहरी महाराष्ट्रातील वंचित कुटुंबांची उपजीविका, कौशल्ये आणि शारीरिक व मानसिक आरोग्य यांसाठी हातभार लावा.

आता देणगी द्या
फोन करा WhatsApp वर संवाद साधा
दुष्काळ आवाहन २०२६–२७

महाराष्ट्र दुष्काळ २०२६–२७ : मदतीचे आवाहन

धाराशिव व सातारा या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये दुष्काळ निवारण व दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सहकार्याची विनंती

महाराष्ट्राचा मोठा भाग गेल्या अनेक दशकांतील सर्वात तीव्र दुष्काळाचा सामना करत आहे — मध्य व आग्नेय महाराष्ट्रात सरासरी पाऊस १०० मि.मी. सुद्धा झालेला नाही. ज्या जावळी (सातारा) आणि तुळजापूर (धाराशिव) तालुक्यांत डीएसटी आधीपासून महिला शेतकऱ्यांसोबत काम करत आहे, तिथे लोकांची उपजीविका वाचवण्यासाठी आम्ही दुष्काळ निवारण व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेत आहोत.

आपले सहकार्य या कामांसाठी वापरले जाईल

  • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
  • जनावरांसाठी चारा व पाणी
  • शासकीय मदत समुदायांपर्यंत पोहोचवणे
  • दीर्घकालीन मृद व जलसंधारण कामे

डीएसटी आयकर कायदा १९६१ च्या कलम ८०जी व १२ए अंतर्गत नोंदणीकृत आहे. प्रचलित नियमांनुसार संस्थेला दिलेल्या देणग्या आयकरातून सवलतपात्र आहेत.